अकोला : महापौर पदासाठी भाजपचे जेष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला आहे. विजय अग्रवाल हे गेल्या २५ वर्षांपासून पालिका सदस्य असून, स्थायी समिती सभापतीपदही काही काळ त्यांनी भुषवले आहे.
उपमहापौर पदासाठी वैशाली शेळके यांनी अर्ज दाखल केला असून दोन्ही उमेदवारांची निवड निश्चित मानली जाते आहे. भाजपला महापालिकेत ८० पैकी ४८ जागा असून ९ तारखेला महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.