तीन दिवसांच्या सुटीनंतर विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार

तीन दिवसांच्या सुटीनंतर आज विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. विधानपरिषदमध्ये आज मराठा आरक्षण विषयावरील चर्चा पूर्ण होणार असून स्वतः मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देणार आहेत. परिषदेच्या कामकाजामध्ये सरकारच्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारण्याबाबत नियम आहे विरोधकांना अधिकार देण्यात आला आहे.

Updated: Dec 13, 2016, 08:52 AM IST
तीन दिवसांच्या सुटीनंतर विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार title=

नागपूर : तीन दिवसांच्या सुटीनंतर आज विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. विधानपरिषदमध्ये आज मराठा आरक्षण विषयावरील चर्चा पूर्ण होणार असून स्वतः मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देणार आहेत. परिषदेच्या कामकाजामध्ये सरकारच्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारण्याबाबत नियम आहे विरोधकांना अधिकार देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणबाबत मुख्यमंत्री विरुद्ध नारायण राणे-धनंजय मुंडे अशी जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोपरडी बलात्कार प्रकरण, ठाणे महानगर पालिका हद्दिमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न, नागपूर शहराला वीज पूरवठा करणा-या स्पॉन्को कंपनीबद्दलच्या तक्रारी , विदर्भातील सोयाबीन - ज्वारी पिकांबाबतच्या समस्या या विषयावर लक्षवेधी प्रश्नाद्वारे चर्चा करण्यात येणार आहे. तर विदर्भातील अपु-या सिंचन प्रकल्पांबाबतही चर्चा ठेवण्यात आली आहे.