विदर्भाच्या अपेक्षांना नवे मुख्यमंत्री न्याय देऊ शकतील?

विदर्भात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. मुख्यमंत्रीही विदर्भातील आहेत. त्यामुळे या भागातील विविध उद्योजक आणि व्यावसायिकांच्या आशा उंचावल्या आहेत. तसंच बळीराजालाही नवीन सरकारकडून शेतीपूरक धोरणांची अपेक्षा आहे.

Updated: Nov 5, 2014, 06:58 PM IST
विदर्भाच्या अपेक्षांना नवे मुख्यमंत्री न्याय देऊ शकतील?  title=

नागपूर : विदर्भात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. मुख्यमंत्रीही विदर्भातील आहेत. त्यामुळे या भागातील विविध उद्योजक आणि व्यावसायिकांच्या आशा उंचावल्या आहेत. तसंच बळीराजालाही नवीन सरकारकडून शेतीपूरक धोरणांची अपेक्षा आहे.

अमेरिकेच्या टाईम मासिकाने ‘शेतकरी आत्महत्येची राजधानी’ अशी विदर्भाची व्याख्या केली होती आणि त्याला कारणही तसेच होते. विदर्भातील पाच जिल्ह्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटला होता. त्यामुळे येथे सिंचनाची सोय तर हवीच पण ती सोय होईपर्यंत इतर ओलीत भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती विदर्भातील कोरडवाहू शेतीला मिळण्याची मागणी होतेय. या भागातील शेतकऱ्यांना या आधी सरकारकडून पॅकेज मिळाले आहे, पण पॅकेज पेक्षा बळीराजाला थेट फायदा होईल असे धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा कृषी तज्ञांनी व्यक्त केलीये. तर सिंचनाच्या सोयी, शेतमालाला योग्य भाव, वीज पुरवठा, खताची आणि बी-बियाणांची उपलब्धता असावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

या भागातील उद्योगांना तारायचे असेल तर विदर्भातील पंच-तारांकित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात लागणारे अतिरिक्त मुद्रांक शुल्क हटवण्याची देखील मागणी येथील उद्योजकांनी केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुक्ष्म आणि लघु उद्योग आहेत. उद्योगांच्या समस्या सोडवण्याकरता स्वतंत्र खाते निर्माण करण्याची गरज असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे. जिल्हा उद्योग मित्र सक्षम करण्या सोबतच बंद असलेल्या उद्योगांच्या जागी तातडीने दुसरे उद्योग उभारण्याची गरज आहे.

उद्योग आणि शेती क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याची अपेक्षा सामान्य विदर्भावासियांची आहे. त्याची हि अपेक्षा किती खरी होते ते येणाऱ्या काळात कळेलच.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.