पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच

पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच आहे. शहराच्या खडकी बाजार परिसरात काल रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली. टोडफोड करणा-या टोळक्यानं केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले आहेत. तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती. गाड्या फोडण्याची दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे.

Updated: Jun 12, 2016, 04:10 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच title=

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच आहे. शहराच्या खडकी बाजार परिसरात काल रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली. टोडफोड करणा-या टोळक्यानं केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले आहेत. तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती. गाड्या फोडण्याची दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे.

शुक्रवारी रात्री देखील काही अज्ञातांनी थेरगाव परिसरात 22 गाड्यांची तोडफोड केली होती. नागरिकांमध्ये तोडफोड करण्याच्या उद्देशानं ही तोडफोड करण्यात आली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र सलग दोन घटना घडूनही पोलिसांकडून अद्याप कुणावरही कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.