वसईतील इसमाने बनवले वीज वाचवण्याचं उपकरण

वसईत राहणाऱ्या एका इसमाने वीज वाचवण्याचं उपकरण तयार केलं आहे. या उपकरणामुळे 10 ते 40 टक्के विजेची बचत होत असल्याचा त्यांचा दावा आहे. 

Updated: May 8, 2016, 08:07 AM IST
वसईतील इसमाने बनवले वीज वाचवण्याचं उपकरण title=

वसई : वसईत राहणाऱ्या एका इसमाने वीज वाचवण्याचं उपकरण तयार केलं आहे. या उपकरणामुळे 10 ते 40 टक्के विजेची बचत होत असल्याचा त्यांचा दावा आहे. 

वसईतल्या आनंदनगर भागात राहणारे संदीप व्होरा यांनी, वीज बचतीचं उपकरण तयार केलं आहे. तब्बल आठ वर्षं संशोधन करुन ३ वेगवेगळ्या प्रकारांतली उपकरणं त्यांनी बनवली आहेत. त्यांची किंमत 2 हजार ते 5 हजार रुपयांदरम्यान आहे. या उपकरणामुळे महिनाकाठी १० ते ४० टक्के वीज बचत होईल असा संदीप व्होरा यांचा दावा आहे. 

संदीप व्होरा यांना त्यांच्या या उपकरणांसाठी ISO चं प्रमाणपत्रही मिळालं आहे. बाजारात अशा प्रकारची उपकरणं उपलब्ध असली तरीही, आपली उपकरणं वेगळी आणि अधिक उपयुक्त असल्याचाही त्यांचा दावा आहे.