वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याची घोषणा

वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जातपंचायतविरोधी मोहिमेला मोठं यश लाभल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Mar 15, 2015, 09:54 PM IST
वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याची घोषणा title=

अहमदनगर : वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जातपंचायतविरोधी मोहिमेला मोठं यश लाभल्याचं सांगण्यात येतंय.
 
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये राज्यातील पंचांनी वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याबाबत ऐतिहासिक घोषणा केली आहे. 

या पंचायतीकडून गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतींकडून समाजघातकी निर्णय दिले जात होते. त्यामुळं आता जुलमी जात पंचायतीमधून सर्वच वैदू समाजाची सुटका झाली आहे.
 
 इतर समाजांनी देखील असा निर्णय घेऊन समाजाला स्वातंत्र्याची फळं चाखू द्यायला हवी. तरंच खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती, विकास होऊ शकेल. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातली कोल्हाटी समाजाची जात पंचायत रद्द झाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.