लोणावळा: वीकेंडच्या पावसाळी पर्यटनाला गेलेल्या दोन युवकांचा लोणावळ्याजवळच्या भुशी डॅमवर बुडून मृत्यू झालाय. दोघेही युवक मुंबईतल्या अंधेरीतील आहेत. भुशी धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेले भूपेन भंडारी आणि अनिकेत हंडे हे दोन २० वर्षीय युवक धरणाच्या पाण्यात बुड़ाले.
यातील भूपेन भंडारी या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक बचाव पथकाला यश मिळालं असून दुसऱ्या युवकाला शोधण्याचे काम सुरु आहे. आज सकाळी ते लोणावळ्यात आपल्या १० वी मधील इतर ११ मित्रांसोबत गेट टुगेदर तसंच पावसाळी पर्यटनासाठी इथं आले होते. विशेष म्हणजे या दोघांनाही पोहता येत नसताना ते पाण्यात उतरल्याचं सांगण्यात येत आहे.
खरंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज नसताना पाण्यात उतरून स्वतःचा जीव गमावण्याची या आठवड्यातील तीसरी घटना असून यात ४ तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.