गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, २ जखमी

जिल्ह्यात गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न झाला, यात  २ जण जखमी झाले, एसटी चालकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. 

Updated: Aug 9, 2016, 08:03 PM IST
गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, २ जखमी  title=

सोलापूर : जिल्ह्यात गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न झाला, यात  २ जण जखमी झाले, एसटी चालकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. 

ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नाविंदगी फाटा ता़ अक्कलकोट येथे घडली. यात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रवाशांनी सतर्कता दाखवल्याने या घटनेनंतर चोरटे पसार झाले. अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

दरम्यान याआधी कंडक्टरच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून एसटीत हैद्रा येथील सराफ यांच्याकडील सोने, चांदी, रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला़ मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला़ मात्र चोरटे आणि सराफाच्या झटापटीत सराफ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़

मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास एमएच १४ बीटी ०६९० या क्रमाकांची एसटी अक्कलकोटहुन हैद्राकडे जात होती. 

या एसटीत एकूण ४५ प्रवासी होते़, यापैकी तिघां प्रवाशांनी नाविंदगी फाटयाचे तिकीटाची मागणी कंडक्टरकडे केली, त्यानुसार कंडक्टरने तिकीट दिले़ नाविंदगी फाटा येताच चला नाविंदगी उतरा, असे कंडक्टरने हाक देताच, या तिघापैकी एकाने वाहन दिवटे यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली.

यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली, यातील अन्य दोघां चोरट्यांनी संपूर्ण एसटी बसमध्ये चटणी फेकून गोंधळ घातला. मात्र ते लूट करण्यात अयशस्वी झाले.