पिंपरी-चिंचवड: मुलींवरच्या अत्याचाराच्या महिनाभरात तब्बल पाच घटनांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर हादरुन गेलाय. भय इथले संपणारच नाही का.... असा सवाल इथल्या विद्यार्थिनींचा आहे.
बलात्काराचा प्रतिकार करता येत नसेल तर एन्जॉय करा, अशी मुक्ताफळं पिंपरी चिंचवड मधल्या सांगवी केशरी महाविद्यालयाच्या निवांत कांबळे या शिक्षकानं उधळली होती. त्याला काही दिवस जात नाहीत तोच आकुर्डी परिसरातल्या क्रिएटिव्ह अकादमीमधल्या अल्पवयीन मुलींचे संचालक नौशाद शेख यानं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं. त्यानंतर ज्ञानदीप शाळेतल्या वरिष्ठ लिपिकाचा प्रताप समोर आला. पुण्यातही येरवड्यातल्या एका शाळेतही लैंगिक शोषणाची घटना घडली तर कोथरूडमध्ये एका स्कूल बस चालकानं मुलीचं लैंगिक शोषण केलं. गेल्या महिनाभरातल्या या घटनांमुळं मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय.
अशा घटना रोखण्यासाठी मुलींसाठी काही विशेष उपाययोजना करण्याची गरज मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
ज्या पोलिसांवर अशा घटना रोखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस मात्र यावर बोलायला तयार नाहीत. शाळांमध्ये मुलींना तक्रार करण्यासाठी पेटी ठेवण्यात आली होती. त्या योजनेचेही तीन तेरा वाजलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.