भिमाशंकर येथे भाविकांच्या ट्रकला अपघात, ४ ठार, ४५ जखमी

भिमाशंकरवरुन देवदर्शन घेऊन परतत असताना झालेल्या ट्रक अपघातात ४ ठार तर ४५ भाविक जखमी झालेत.

Updated: Feb 20, 2016, 09:00 PM IST
भिमाशंकर येथे भाविकांच्या ट्रकला अपघात, ४ ठार, ४५ जखमी title=

पुणे : भिमाशंकरवरुन देवदर्शन घेऊन परतत असताना झालेल्या ट्रक अपघातात ४ ठार तर ४५ भाविक जखमी झालेत.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर गावातील हे भाविक आळंदीकडे मुक्कामी जात असताना भिमाशंकर खेड रोडवर हा अपघात झाला. या रस्त्यावरील एका वळणावर ट्रक एका दरीत पलटी झाला.

अपघातानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी या अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. या सगळ्या जखमींवर घोडेगाव, मंचर आणि पुणे इथं उपचार सुरु आहेत.