मुंबई : महाराष्ट्रात टोलमुक्तीची अधिसूचना फडणवीस सरकारनं अखेर आज (शुक्रवारी) जारी केलीय. यानुसार, राज्यातले १२ टोलनाके पूर्णत: बंद होणार आहेत. तर, तब्बल ५३ टोलनाक्यांवर एसटी आणि छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. १ जूनपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली होती. निवडणुकीदरम्यानही राज्य टोलमुक्त करणार असं आश्वासन भाजपनं दिलं होतं.
महाराष्ट्राला संपूर्ण टोलमुक्ती मिळाली नसली, तरी या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मात्र नक्कीच मिळालाय. टोल मुक्तीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.