शिराळा, शिराळा: जगप्रसिद्ध शिराळ्यात 'नागाच्या प्रतिमेचं' पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून शिराळयात यंदा नागपंचमी साजरी होत आहे.
मात्र केंद्र सरकारनं कायदयात बदल करून नागपंचमीसाठी शिथिलता द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नागपंचमीनिमित्त शिराळ्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बंदोबस्तासाठी ४० अधिकारी आणि ३०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तर वनखात्यातील १४ अधिकारी आणि १७५ कर्मचारी शिराळ्यात दाखल झालेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करण्या बाबत पोलीस आणि वनविभागामार्फत ग्रामास्थांना आवाहन करण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.