वीजतारांच्या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू

वीजतारांच्या सापळ्यात अडकून एका वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपुरात घडली आहे.

Updated: Nov 4, 2016, 09:12 PM IST
वीजतारांच्या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू  title=

चंद्रपूर : वीजतारांच्या सापळ्यात अडकून एका वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपुरात घडली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रात धानापूर शेतशिवारात हा प्रकार घडला.

वन्य जीवांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी संदीप वैद्य नावाच्या शेतक-यानं वीजतारांचा सापळा तयार केला होता. या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी शेतकरी संदीप वैद्य वन विभागाला शरण आला आहे.