तीन मुलांकडून अल्पवयीन मुलीची छेड, घेतला गळफास

पुण्यात धक्कादायक बाब पुढे येत आहे. याआधी पिंपरीत कुमारी मातांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता पिंपरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने ३ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Updated: Jan 15, 2015, 01:59 PM IST
तीन मुलांकडून अल्पवयीन मुलीची छेड, घेतला गळफास title=

पिंपरी : पुण्यात धक्कादायक बाब पुढे येत आहे. याआधी पिंपरीत कुमारी मातांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता पिंपरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने ३ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

या मुलीची मुलांनी छेड काढल्यानंतर मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदवली होती. मात्र, एस.एच. भागवत या महिला पोलीस उपनिरीक्षकेच्या अकार्यक्षमतेमुळे त्या ३ मुलांनी पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीची छेड काढली.

या सर्व प्रकरणाने घाबरलेल्या मुलीने अखेरीस आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या ती मुलगी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.