ठाणे : वजनदार राजकीय नेता, लोकप्रतिनिधी म्हंटलं की त्या नेत्यामागे कार्यकर्त्यांचा गराडा, पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्यांचा ताफा, हे चित्र तसं आपल्या अंगवळणी पडलंय. मात्र या व्हीव्हीआयपी मंडळींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारा दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे प्रचारसभा स्थानी पोहोचण्याकरता, सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेऊन, चक्क दुचाकीवरुन प्रवास करावा लागला.