रेस अक्रॉस अमेरिका जिंकली, महाजन बंधूंची हत्तीवरुन मिरवणूक

अमेरिकेतली प्रतिष्ठेची रेस अक्रॉस अमेरिका ही जागतिक सायकल स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करुन, नाशिकमधले महाजन बंधू मायदेशी परतलेत आणि त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली.

Updated: Jul 2, 2015, 03:32 PM IST
 रेस अक्रॉस अमेरिका जिंकली, महाजन बंधूंची हत्तीवरुन मिरवणूक title=

नाशिक : अमेरिकेतली प्रतिष्ठेची रेस अक्रॉस अमेरिका ही जागतिक सायकल स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करुन, नाशिकमधले महाजन बंधू मायदेशी परतलेत आणि त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली.

मुंबई विमानतळावर महेंद्र आणि हिंतेंद्र महाजन बंधूंचं यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं. तर या त्यांच्या विक्रमाबद्दल नाशिककरांनी हत्तीवरुन ढोलताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली.

तब्बल चार हजार आठशे किलोमीटर लांबीची खडतर स्पर्धा, अशी रेस अक्रॉस अमेरिका या सायकल स्पर्धेची ओळख आहे. ही स्पर्धा नऊ दिवसांत पूर्ण करण्याचं आव्हान या डॉक्टर दुकलीवर होतं. मात्र या दोघांनी हे अंतर दहा तास आधी म्हणजे आठ दिवस आणि चौदा तासांतच पूर्ण केलं. 

जगभरातून एकशेतीस संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. शारीरिक कसोटी पाहणारं आव्हान म्हणून या सायकल स्पर्धेकडे पाहिलं जातं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.