ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयिताला अटक

 महाराष्ट्र एटीएसने केरळ एटीएस यांच्या मदतीनं ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयिताला अटक केली आहे. आर्शिद कुरेशी असं त्याचं नाव आहे.

Updated: Jul 22, 2016, 05:34 PM IST
ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयिताला अटक  title=

नवी मुंबई :  महाराष्ट्र एटीएसने केरळ एटीएस यांच्या मदतीनं ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयिताला अटक केली आहे. आर्शिद कुरेशी असं त्याचं नाव आहे.

नवी मुंबईतून केरळ ATS नं, ठाणे ATS च्या मदतीनं आर्शिद कुरेशीला अटक केली. आर्शिद कुरेशी हा झाकीर नाईकचा खास माणूस असून, कुरेशीनं केरळमधल्या १९ मुलांना आयसीसच्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरीत केलं होते. त्यात तीन मुलींचाही समावेश आहे.

आर्शिदला ४ दिवसांची पोलीस कोठडी सीबीडी बेलापूर न्यायालयाने दिली आहे. महाराष्ट्र एटीएस त्याला आपल्या ताब्यात ठेवणार आहे. ४ दिवसानंतर त्याला केरळ ATS च्या ताब्यात दिलं जाणार आहे.