ठाणे: ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.
पालिका सभागृहातल्या धक्काबुक्कीनंतर दोन्ही गटातल्या नगरसेवकांनी थेट पालिकेच्या पटांगणाचे रणांगण केलं. दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्याऐवजी हे लोकप्रतिनिधी एकमेकांना बदडण्यात व्यस्त होते. अखेर इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत केले.
विक्रांत चव्हाण यांनी हाणामारीसाठी चक्क बाहेरून मुलं मागवल्याचा आरोप होतोय. या मुलांकडे रॉड आणि काठ्या होत्या. चव्हाण यांनी हाणामारीदरम्यान पिस्तूल काढल्याचाही आरोप किणे यांनी केलाय.
किणे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातले वैर सर्वश्रूत आहे. तर चव्हाण हे आव्हाडांचे निकटवर्तीय आहेत. या भांडणाला हीच किनार असल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.