महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसिलदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी पदावर काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Sep 2, 2015, 08:34 PM IST
महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा title=

नांदेड : नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसिलदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी पदावर काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसिलदार जिवराज डापकर आणि अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संगनमत करत अज्ञात ठिकाणी बोलावून शारिरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केला आहे.

मागणी पूर्ण केली नसल्याने विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची धमकी दिल्याचाही आरोप या महिलेनं केला आहे. डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या काळात या दोघांनी वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे. 

या प्रकाराविरुध्द तलाठी असलेल्या महिलेने धाडसाने स्वामी आणि डापकर यांच्याविरोधात तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकूमार यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती.

वरिष्ठ अधिकारी असल्यानं हे प्रकरण जाणीवपूर्वक विशाखा समितीकडे प्रलंबित ठेवण्यात आलं. मात्र पीडित महिलेनं हार न मानता पोलिसांत या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने या दोन्ही अधिकाऱ्यांशी फोनवरून झालेल्या संभाषणाचे पुरावे दिल्यानंतर देगलूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.