विवाहिता संशयास्पद मृत्यू, सासरच्यांविरोधात तक्रार देऊनही पोलिसांकडून टाळाटाळ

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार करुनही अद्याप सखोल चौकशीला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. तर मृत महिलेचा पती पोलीस कर्मचारी असल्याने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचाही आरोप मृत महिलेच्या घरच्यांनी केलाय. 

Updated: Jul 2, 2016, 12:13 PM IST
विवाहिता संशयास्पद मृत्यू, सासरच्यांविरोधात तक्रार देऊनही पोलिसांकडून टाळाटाळ title=

नवी मुंबई : विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार करुनही अद्याप सखोल चौकशीला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. तर मृत महिलेचा पती पोलीस कर्मचारी असल्याने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचाही आरोप मृत महिलेच्या घरच्यांनी केलाय. 

खारघरमध्ये राहणाऱ्या वर्षाराणी गेंड वय वर्ष ३५ यांचा ३० मे रोजी खारघर रेल्वेस्थानकाजवळ मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप वर्षाराणी यांच्या माहेरच्यां व्यक्तींनी केला आहे.

वर्षाराणी यांचे पती शशीकांत गेंड हे नवी मुंबईत पोलीस दलात कामाला असून त्यांना दुसर लग्न करायचं होते, असा आरोप वर्षाराणीचे भाऊ विनोद आटपाडकर यांनी केला आहे. घटनेच्या दिवशी गेंड यांनी वर्षाराणीच्या माहेरी फोन करुन त्या हरवल्या असल्याचं सांगितले होते.