देशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी!

देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.

Updated: Apr 21, 2017, 06:00 PM IST
देशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी! title=

जावेद मुलाणी, इंदापूर : देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.

कृत्रिम रेतन

पुणे जिल्ह्याच्या इंदापूरातील माजीदखान पठाण यांच्या या देशी गाईंच्या गोठ्यात देशातील पहिला 'सरोगेट काऊ'चा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय. माजीदखान यांनी जे. के. ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या गोठ्यातील गाईच्या गर्भाशयातून स्त्री बीजे काढून ती कृत्रिम रेतनासाठी फिरत्या प्रयोगशाळेत पाठवली होती. त्या स्त्री बीजापासून प्रयोगशाळेत  कृत्रिम गर्भ वाढवण्यात आला होता. तो गर्भ या गोठ्यातील गाईच्या गर्भात यशस्वीपणे सोडण्यात आलाय.

शिवारातली प्रयोगशाळा

देशी गाईंच्या वंश वाढवण्यासाठीचं माजीदखान पठाण यांनी हा रचना खिलार फार्म  उभारला आहे.त्यांच्या या गोठ्यात विविध जातीच्या देशी गाई आहेत. जनावरांच्या कृत्रिम रेतनासाठी जे. के. ट्रस्टची फिरती प्रयोगशाळा फायदेशीर असून ही प्रयोगशाळा थेट शिवारात जावून सेवा पुरवतेय.

खरं तर अशा प्रकारच्या प्रयोगासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे तो   सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडत नाही. मात्र, माजीदखान पठाण यांनी देशी गोवंशाच्या वाढीसाठी हा प्रयोग केला आहे. पशू वैद्यकीय व्यवसाय तसेच पशू वैद्यक शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.

एकावेळेस एकापेक्षा जास्त वासरांचा जन्म शक्य

देशी गाय प्रत्येक वेताला एकचं वासरु जन्माला घालते. मात्र, या कृत्रिम गर्भधारणेमुळे एकापेक्षा अधिक वासरांना जन्माला घालता येणार आहे आणि त्याचा फायदा देशातील धवलक्रांती आणखी विकसीत करण्यासाठी होईल.