जितेंद्र आव्हाडांच्या खात्यात तेे १ कोटी कुठून आले?

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी आज सरकारी पक्षानं धक्कादायक खुलासा केला...

Updated: Dec 1, 2015, 10:05 AM IST
जितेंद्र आव्हाडांच्या खात्यात तेे १ कोटी कुठून आले?  title=

ठाणे : सूरज परमार आत्महत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी आज सरकारी पक्षानं धक्कादायक खुलासा केला...

ठाणे महापालिकेचा राष्ट्रवादीचा  नगरसेवक नजीब मुल्ला याच्या खात्यातून १ कोटी रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात वळते झालेत. त्याशिवाय इतर ३ नगरसेवकांच्या खात्यातूनही अनेक नेत्यांना पैसा वळते झाल्याचे पुरावे आज सरकारी वकिलांनी मुंबई हायकोर्टात सादर केले. 

हे पैसे कसे आणि कोणत्या कारणासाठी देण्यात आलेत याची चौकशी व्हावी, यासाठी या ३ नगरसेवकांना पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती सरकारी पक्षाने केली.  त्यामुळे सुरज परमार प्रकरणात आता ठाण्यातील बड्या नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जातेये. 

ठाण्यातील नगरसेवक हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांच्या छळाला कंटाळून सुरज परमार यांनी आत्महत्या केलीये असा आरोप या नगरसेवकांवर आहे. 

या चार नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व मंजूर केला होता. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर आज सुनावणी झाली. उद्या या अटकपुर्व जामिनावर पुन्हा सुनावणी सुरु राहणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.