शहीद जवान सूर्यवंशी यांचे पार्थिव साताऱ्यात

सियाचीन येथे हिमस्खलन होऊन वीरगती प्राप्त झालेले मस्करवाडी ता. माण येथील जवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा साताऱ्यात आणण्यात आले. मंगळवारी मस्करवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Updated: Feb 16, 2016, 12:53 AM IST
शहीद जवान सूर्यवंशी यांचे पार्थिव साताऱ्यात title=

सातारा : सियाचीन येथे हिमस्खलन होऊन वीरगती प्राप्त झालेले मस्करवाडी ता. माण येथील जवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा साताऱ्यात आणण्यात आले. मंगळवारी मस्करवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

सियाचीन येथे दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भारतीय सीमेचे रक्षण करताना हिमस्खलन झाले, यात लष्कराचे दहा जवान बर्फाखाली गाडले गेले होते. बेपत्ता जवानांचा शोध सहा दिवसांनी ९ फेब्रुवारी रोजी लागला होता. या दुर्घटनेत माण तालुक्याने सुनील सूर्यवंशी यांच्या रूपाने सुपुत्र गमावला.