कर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले

Updated: Jun 19, 2016, 10:00 PM IST
कर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले title=

ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.

सकाळी 9 वाजल्यापासून संथगतीने कर्मचा-यांकडून कागदपत्र तपासणी सुरु होती. या वेळकाढूपणामुळं विद्यार्थी पावणे दहापर्यंत रांगेत ताटकळत होते. त्याचवेळी कर्मचा-यांनी या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत घेतलं नाही.. याची माहिती मिळताच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली. केंद्र कर्मचा-यांशी चर्चा करुन या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याची सरनाईकांची विनंती मान्य केली. मात्र क्षुल्लक कारणं काढून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचं कर्मचा-यांनी सांगितलं. परीक्षेला बसू दिले नाही तर, आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी विद्यार्थांनी यावेळी दिला.