संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळवाडी गावाला दुपारच्या सुमारास, वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसानं झोडपलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 6, 2017, 10:46 PM IST
संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस title=

शिर्डी : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळवाडी गावाला दुपारच्या सुमारास, वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसानं झोडपलं. बोटा, अकलापूर, माळवाडी, आंबी दुमाला या गावांना पावसाचा तडाखा बसला. या पावसामुळे डाळींब, द्राक्षाच्या बागा आणि कांदा पिकांचे मोठं नुकसान झालंय. 

या पावसाने अनेक शेतक-यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून गेली. केळवाडी इथल्या बबन कुऱ्हाडे यांच्या शेतात असलेल्या अर्ध्या भरलेल्या शेत तळ्यातील प्लॅस्टिक वादळी वाऱ्याने फाटल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. 

या पावसाने कु-हाडे द-यातील मोठा तलाव पूर्ण भरला. सर्व लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागलेत. त्यामुळे इथला रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झालीय. दोन तास पावसाचा धूमाकूळ सुरु होता.