पुणे : पावसाळ्याच्या दिवसांतच उन्हाळ्याच्या झळा महाराष्ट्राला सोसाव्या लागतायत. पावसाचा ऋतूचा अर्ध्याहून जास्त काळ पावसाविनाच गेलाय... त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याला भुंगा लागलाय... म्हणूनच, पुढे काय? हा प्रश्न पडलेल्या महाराष्ट्रवासियांसाठी ही एक दिलासादायक बातमी...
या वर्षीच्या आत्तापर्यतच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस कमी झाला. पण मान्सूनचा अजून दीड महिना बाकी आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस होतो, असा दिलासाभारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी दिलाय.
पुण्यात केळकर यांच्याशी आयोजीत वार्तालापात त्यांनी हा दिलासा दिला. त्यामुळे अजूनही पाऊस गेलेला नाही ही खरंतर खुषखबरच म्हणायला हवी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.