सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान

तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.

Updated: Feb 5, 2016, 11:10 PM IST
सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान title=

मुंबई : तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.

थुंकण्याविरोधातला कायदा अधिक कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि कायदे विभागात चर्चाही सुरु आहे. त्यामुळे कायद्यामधले हे बदल येत्या अधिवेशनात येऊ शकतात.

कायद्यातल्या या बदलानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना जास्त दंड भरावा लागू शकतो, तसंच अशा नागरिकांना समाजसेवा करायला लावयचा बदलही केला जाऊ शकतो.