मुलानेच वडिलांना रॉकेल टाकून पेटवले

मुलानेच वडिलांना रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. शेत दुस-याकडे लावून पैसे देण्याची मुलानं वडिलांकडे मागणी केली होती. वडिलांना त्याला नकार दिल्याचा राग येऊन आरोपी धनराज ढाले यांनं थेट रॉकेल टाकून वडिलांना पेटवून दिलं.

Updated: Apr 3, 2017, 04:23 PM IST
मुलानेच वडिलांना रॉकेल टाकून पेटवले title=

उस्मानाबाद : मुलानेच वडिलांना रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. शेत दुस-याकडे लावून पैसे देण्याची मुलानं वडिलांकडे मागणी केली होती. वडिलांना त्याला नकार दिल्याचा राग येऊन आरोपी धनराज ढाले यांनं थेट रॉकेल टाकून वडिलांना पेटवून दिलं.

उमरगा तालुक्यातल्या मुरूममध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत 80 वर्षीय वडील मल्कपा ढाले यांचे जागेवरच निधन झाले आहे.