नाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?

राज्यात मनसेची पायाभरणी करणा-या नाशिकमध्ये सध्या दुफळी निर्माण झालीय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत. 

Updated: Jul 6, 2014, 05:15 PM IST
नाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार? title=

नाशिक : राज्यात मनसेची पायाभरणी करणा-या नाशिकमध्ये सध्या दुफळी निर्माण झालीय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत. 

भाजपाला दिलेला शब्द टाळून मनसेच्या राहुल ढिकले यांना सभापती केल्यानं पक्षात सरळसरळ दोन गट पडलेत. लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराचा झालेला दारूण पराभव लक्षात घेता राज ठाकरे पदाधिका-यांबाबत नाराज होते. 

लोकांपर्यंत कामं पोहोचत नाहीत म्हणून गेल्या काही काळापासून वसंत गिते यांना निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येत होते. 

स्वतः अभ्यंकर हे मुंबईतून येऊन सूत्रे हलवत असल्यामुळे गिते यांनी नाराजी प्रकट केलीय. त्यामुळे राज ठाकरे हे तातडीने नाशिक दौ-यावर येत असून नाराजांना समजवण्यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आलीय. 

विधानसभा आणि महापौर निवड तोंडावर असताना गटबाजी उफाळून आल्यास मनसेला अडचण निर्माण होऊ शकते म्हणून ड्मेज कंट्रोल करण्यासाठी राज ठाकरे काय पावलं उचलतात, याकडे राज ठाकरे यांच लक्ष लागलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.