धक्कादायक : 'स्मशानातलं सोनं' चोरीला जातंय...

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर परिसरातील भागात एक अजब प्रकार होतोय. गावातील कोण श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती अथवा सुवासिनी मयत झाली की तिची दहन केलेली राख पळवून नेण्याचा प्रकार घडतोय. ही राख चोरीला जावू नये म्हणून गावकऱ्यांना तीन दिवस दहनाची राख राखण करण्यासाठी स्मशानभूमीत राहावे लागतंय.

Updated: Jan 29, 2015, 09:11 PM IST
धक्कादायक : 'स्मशानातलं सोनं' चोरीला जातंय... title=

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर परिसरातील भागात एक अजब प्रकार होतोय. गावातील कोण श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती अथवा सुवासिनी मयत झाली की तिची दहन केलेली राख पळवून नेण्याचा प्रकार घडतोय. ही राख चोरीला जावू नये म्हणून गावकऱ्यांना तीन दिवस दहनाची राख राखण करण्यासाठी स्मशानभूमीत राहावे लागतंय.

पंढरपुरातलं कौठाळी गावात बागायती परिसर असल्यानं गावात तशी सुबत्ता नांदते. मात्, सध्या इथल्या नागरिकांना एका वेगळ्याच प्रश्नानं ग्रासलंय. गावातल्या एखाद्या महिलेचा मृत्यू झाला की गावकऱ्यांना पुढचे तीन दिवस मृतदेहाच्या राखेची राखण करावी लागतेय. त्याला कारणही तसंच आहे... सोनं हाती लागेल या आशेनं गावातल्या स्मशानभूमीतून महिलांच्या मृतदेहांची राख चोरीला जातेय. चोरटे रात्री स्मशानभूमीत येतात आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेहावर पाणी मारुन राख गोळा करुन निघून जातात. 

याबाबत वारंवार तक्रार करुनही पोलीस 'स्मशानातलं सोनं' नेणाऱ्या चोरांचा शोध लावू शकले नाहीत.. त्यामुळे गावकरीच आता याठिकाणी राखण करतात. अलिकडंच गावकऱ्यांनी दोघा चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिलं. मात्र, पोलिसांनी चोरांवर कारवाई करण्याऐवजी उलट ग्रामस्थांनाच धमकावलं. 

मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे अनेक जण असतात. आता मयताच्या अंगावरचं सोनं लुटणारे हे चोरटे केवळ थोड्याशा सोन्याच्या आमीषानं सगळी राख चोरुन नेतात. त्यामुळे नातेवाईकांना पुढील धार्मिक विधी करता येत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.