कल्याण-डोंबिवलीची परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटीची निवड : मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीने आम्हाला भरभरुन दिलेय. येथील परिस्थिती बदलण्यासाठी आमच्यावर जबाबदारी दिली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या शहरांची निवड केलेय. कल्याण-डोंबिवली करिता आमचे स्वप्न काय आहे, हे सर्वांना समजावे. या शहरांचा विकास करण्यासाठी विचार केलाय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Updated: Oct 3, 2015, 10:52 PM IST
कल्याण-डोंबिवलीची परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटीची निवड : मुख्यमंत्री title=

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीने आम्हाला भरभरुन दिलेय. येथील परिस्थिती बदलण्यासाठी आमच्यावर जबाबदारी दिली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या शहरांची निवड केलेय. कल्याण-डोंबिवली करिता आमचे स्वप्न काय आहे, हे सर्वांना समजावे. या शहरांचा विकास करण्यासाठी विचार केलाय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषदेला सुरुवात होण्याआधी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस पडत असताना लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहील्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांचीही हजेरी लावली. तसेच विशेष उपस्थिती ही अभिनेता सचिन खेडेकर याची जाणवली. भाजपाच्या मंचावर सचिन खेडेकरसह भाजपाचे वरिष्ठ मंत्री परिषदेला उपस्थित होते.  

स्मार्ट सिटीचा ज्यावेळी विचार झाला. त्यावेळी मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीच्यावेळीच जवळच्या चार महानगरपालिकांचा विचार केला. त्यांना कसे स्थान द्यायचे याचा विचार केला. यामध्ये कल्याण-डोंबिवली पालिकेचा विचार केला. त्याचा आम्ही पाठपुरावा केला. म्हणून या शहराचा स्मार्टसिटी समावेश झाला. येथील विकास करण्यासाठीच हा निर्णय केलाय, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

कल्याण शहराला इतिहास आहे. तर डोंबिवली हे सांस्कृतीक शहर आहे. त्यामुळे ऐतिहासिक शहरांना विसरणे शक्य नाही. जे इतिहासाला विसारतात. जे आपल्या संस्कृतीला विसरतात. त्यांना कधीच भविष्य राहत नाही. म्हणून आम्ही विचार केला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईबरोबरच स्मार्ट सिटीसाठी कल्याण-डोंबिवलीची निवड केली. एखादी पालिका कमी झाली तरी चालेत. एकाद्या पालिकेवर अन्याय झाला तरी चालेल. मात्र, इतिहास लाभलेल्या शहरांवर अन्याय होता कामा नये, म्हणून निवड केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यापुढे विकास हा 'DF' करु शकतात, असे उद्गार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. विकास करणारा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस होय, अशी स्तुती मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची केली. या कार्यक्रमापासून शिवसेनेला लांब ठेवण्यात आले होते. यावेळी मुनगंटीवार यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.