उंचीचा न्यूनगंड जीवावर बेतला!

कमी उंचीचा न्यूनगंड एखाद्या तरूणांचं आयुष्य कसं उध्वस्त करू शकतो याचं उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळालं. प्रेम पटेल... वय वर्षे अवघं १७... प्रेम आपल्या समवयस्क मुलांप्रमाणे खेळायचा... बागडायचा... पण, आज प्रेमवर कुबडीचा आधार घेऊन चालणं नशिबी आलंय. प्रेमवर ही वेळ आलीय उंची कमी असल्याच्या न्यूनगंडामुळे आणि त्यातून सायन हॉस्पिटलमध्ये फसलेल्या ऑपरेशनमुळे...

Updated: Aug 18, 2015, 11:59 PM IST
उंचीचा न्यूनगंड जीवावर बेतला! title=

कल्याण : कमी उंचीचा न्यूनगंड एखाद्या तरूणांचं आयुष्य कसं उध्वस्त करू शकतो याचं उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळालं. प्रेम पटेल... वय वर्षे अवघं १७... प्रेम आपल्या समवयस्क मुलांप्रमाणे खेळायचा... बागडायचा... पण, आज प्रेमवर कुबडीचा आधार घेऊन चालणं नशिबी आलंय. प्रेमवर ही वेळ आलीय उंची कमी असल्याच्या न्यूनगंडामुळे आणि त्यातून सायन हॉस्पिटलमध्ये फसलेल्या ऑपरेशनमुळे...

कल्याणजवळच्या उंबार्ली गावात राहणाऱ्या प्रेमला उंची कमी असल्यामुळे शाळेत मित्र चिडवायचे. त्यामुळे तो आईकडे कटकट करायचा. कल्याणच्या स्थानिक डॉक्टरांनी या संदर्भात प्रेमला सायन हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. त्यानुसार सायन हॉस्पिटलमध्ये नेलं असता तिथले डॉक्टर बिनोती शेठ यांनी प्रेमची उंची नक्की वाढेल अशी हमी दिली. काही दिवसांनी प्रेमच्या पायाचं ऑपरेशन झालं पण ऑपरेशन असफल झाल्याचं लक्षात आलं. आताा, प्रेमला कुबड्यांना धरून चालावं लागत आहे. 

प्रेमच्या पायाला जखमा झाल्या आहेत. त्याला चालता येत नाहीये. डॉक्टर बिनोती शेठ यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नसल्याचा आरोप प्रेमची आई मीना पटेल यांनी केलाय.   

 सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. सुलेमान मर्चंट यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय. ऑपरेशननंतर फॉलोअपसाठी रेग्युलर बोलावले असता प्रेम पटेल नियमीतपणे आला नाही. एप्रिल 2013 मध्ये ऑपरेशन झाल्यावर फॉलोअपसाठी तो डिसेंबर 2013 मध्ये आला. रूग्ण परत हॉस्पिटलकडे आल्यास आम्ही त्याच्यावर परत उपचार करू, असं त्यांनी म्हटलंय. 
 
 प्रेमच्या ऑपरेशनला दीड वर्ष उलटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष खरात याप्रकरणी पाठपुरावा करत आहेत. उंची कमी असली म्हणून काय झालं.. त्याचा न्यूनगंड बाळगण्याचं खरं म्हणजे कारण नाही. त्यासाठी असे कोणत्याही प्रकारचे उपचारही करून घेण्याची आवश्यकता आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.