विक्रमगड येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, २५ तोळे सोने लुटले

 जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उपसरचिटणीस मनोहर भानुशाली यांच्या घरी काल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. 

Updated: Jan 14, 2016, 09:19 AM IST
विक्रमगड येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, २५ तोळे सोने लुटले title=

पालघर :  जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उपसरचिटणीस मनोहर भानुशाली यांच्या घरी काल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. 

बंदुकीच्या धाक दाखवून चार दरोडेखोरांनी अंदाजे 25 तोळे सोनं आणि 20 ते 25 हजारची कॅश लुटूल्याचं समजतय. यावेळी मनोहर भानुशाली यांच्या आई घरात एकट्या होत्या. 

या प्रकरणी विक्रमगड पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान सदर दरोडाचा निषेध म्हणून येथील व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.