Shocking : अडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन अत्याचार

अडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगरच्या केडगांवमध्येही संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय.

Updated: Dec 11, 2016, 12:09 AM IST
Shocking : अडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन अत्याचार title=

अहमदनगर : अडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगरच्या केडगांवमध्येही संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय.

चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले. चिमुकलीची तब्येत गंभीर असून तिला उपचारासाठी पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अज्ञात इसमांविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची अद्यापही ओळख पटलेली नसल्याने या मुलीचे आई-वडील कोण आहेत याचाही शोध सुरु आहे.