सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार - अजित पवार

यंदाच्या महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेनेची ताकद वाढणार, अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवलीय. 

Updated: Feb 21, 2017, 10:49 PM IST
सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार - अजित पवार  title=

बारामती : यंदाच्या महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेनेची ताकद वाढणार, अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवलीय. 

'निकाल जाहिर झाल्यानंतर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार', असं भाकीत अजितदादांनी केलंय. गेल्या दोन वर्षांत शिवसेनेला भाजपपुढे अनेकदा नमतं     घ्यावं लागलं... परंतु, या निवडणुकीनंतर मात्र सेना बॅकफूटवर राहणार  नाही, असं त्यांनी म्हटलंय. 

महापालिकांचा निकाल लागल्यानंतर सेनेकडून मंत्रिमंडळात मोठी पदांची मागणी केली जाऊ शकते... त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शिवसेना टोकाची भूमिका घेऊ शकते, असंही भाकीत अजित पवार यांनी वर्तवलंय. 

अजित पवार आज सकाळी बारामती येथील काटेवाडी गावातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते... त्यावेळी, त्यांनी आपल्या राजकारणातील अनुभवावर ही गणितं मांडलीत.