शिवसैनिकांनी 'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळला

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. 

Updated: Mar 27, 2017, 01:50 PM IST
शिवसैनिकांनी 'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळला title=

उस्मानाबाद : उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. 

खासदार रविंद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. लोहारा इथं शिवसैनिकांनी एयर इंडियाच्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळलाय... शिवसैनिकांनी गायकवाड यांना समर्थन देण्यासाठी बाईक रॅलीगी काढली. उस्मानाबादेत सेना कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. 
 
लोहारा आणि उमरगा तालुका बंदची हाक देण्यात आलीय. शिवसेनेच्या वतीने दोन्ही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. या बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे गावातील दुकानं बंद आहेत. या दोन्ही ठिकाणी चौक आणि रस्त्यावर या बंदचा परिणाम जाणवतोय.