शिव वडापावच्या गाडीवर कारवाई, पालिका अधिकाऱ्यावर शिवसैनिकाची शाईफेक

शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यावर शिवसैनिकाने शाईफेक केल्याने खळबळ उडाली आहे.

Updated: Dec 24, 2016, 12:00 PM IST
शिव वडापावच्या गाडीवर कारवाई, पालिका अधिकाऱ्यावर शिवसैनिकाची शाईफेक title=
प्रातिनिधिक फोटो

कल्याण : शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यावर शिवसैनिकाने शाईफेक केल्याने खळबळ उडाली आहे.

 ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून शुक्रवारी क प्रभाग कार्यालयात ही शाईफेक करण्यात आली. त्यांच्यावर शाईफेक करणाऱ्या श्याम क्षीरसागर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो स्वतःला शिवसेना चर्मकार सेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगत आहे.

कल्याण स्टेशन परिसरात असणाऱ्या क्षिरसागर यांच्या शिव वडापावच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी पालिकेने कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान गाडीवर असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमाही तोडण्यात आल्याचा आरोप श्याम क्षीरसागर यांनी केला. त्याच्या निषेधार्थ आपण ही प्रभाग अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई फेकल्याचेही क्षीरसागर याने सांगितले.