मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॉम्बसदृश वस्तू, एकास अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पुण्यात पुणे-पिंपरी या नियोजित मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र, पिंपरी येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Updated: Dec 24, 2016, 11:08 AM IST
मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॉम्बसदृश वस्तू, एकास अटक title=

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पुण्यात पुणे-पिंपरी या नियोजित मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र, पिंपरी येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 मोदी येण्याच्या काही तास आधीच बॉम्बसदृश्य वस्तू सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विश्वनाथ साळुंखे असे संशयित व्यक्तीला  ताब्यात घेतले आहे. साळुंखेच्या घरात ही स्फोटके आढळल्याचे वृत्त आहे.
 
धमकीचा एक फोन चिंचवड पोलिसांना आला होता. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोध पथकाने विश्वनाथ साळुंखेच्या घराची झडती घेतली असता तिथे कमी तीव्रतेची स्फोटके आढळून आली. याप्रकरणी विश्वनाथ साळुंखेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.