शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 11, 2017, 12:13 PM IST
शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध title=

नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

शेतकरी संकटात असतांना शेतकरीविरोधी बोलून दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान यांनी केल्याचा आरोप यावेळी शिवनसेने केला. येवला तालुक्यातील शिवसैनिक विंचुर चौफुलीवर जमा झाले आणि घोषणाबाजी केली. 

यावेळी रावसाहेब दानवे यांचा धिक्कार करीत घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काहीकाळ राज्य महामार्गावरील वाहतूक रोखली गेली होती.