शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर, भाजपचे प्रमोद राठोड यांची उपमहापौरपदी निवड

औरंगाबाद महापालिकेवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या त्र्यंबक तुपेंची महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपच्या प्रमोद राठोड यांची निवड झालीय.

Updated: Apr 29, 2015, 02:31 PM IST
शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर, भाजपचे प्रमोद राठोड यांची उपमहापौरपदी निवड title=

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या त्र्यंबक तुपेंची महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपच्या प्रमोद राठोड यांची निवड झालीय.

ऐनवेळी बसपानं युतीला पाठिंबा दिला. महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांची निवड झाली त्यांना ७१ मतं मिळाली. तर विरोधात असलेल्या एमआयएमच्या गंगाधर ढगे यांना २५ मतं मिळाली. तर उप महापौरपदी भाजपचे प्रमोद राठोड यांची निवड झाली. त्यांना ७० मतं पडली.  
 
युतीमध्ये ठरलेल्या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला चार वर्षे आणि भाजपला एक वर्ष महापौरपद मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार पहिली दीड वर्ष शिवसेनेचा महापौर असेल त्यानंतर एक वर्ष महापौरपद भाजपकडे असेल आणि उर्वरित अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेचा महापौर होईल. तर स्थायी समितीचं अध्यक्षपद सुरुवातीला तीन वर्षे भाजपकडे आणि त्यानंतर दोन वर्षे शिवसेनेकडे असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.