गडचिरोलीत सातवीतील विद्यार्थिनीवर शाळा शिपायांकडून बलात्कार

जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्याच दोन शिपायांनी बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.

Updated: Dec 16, 2015, 05:08 PM IST
गडचिरोलीत सातवीतील विद्यार्थिनीवर शाळा शिपायांकडून बलात्कार title=
संग्रहीत

गडचिरोली : जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्याच दोन शिपायांनी बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.

ही विद्यार्थिनी गेले काही दिवस आजारी होती. तिला तिच्या घरी सोडण्याची जबाबदारी या दोघांवर टाकण्यात आली होती. मात्र त्या नराधमांनी वाटेत दुब्बागुडमच्या जंगलात मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला तिच्या घरीही सोडले. 

पीडित विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगताच त्यांनी भामरागड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केलाय. आरोपी  प्रशांत पिलारे आणि बंडू मडावी यांना अटक करण्यात आली आहे.