जातीबाहेर लग्न: देवरूखच्या शेलार कुटुंबियांना गावकीनं टाकलं वाळीत

रायगड जिल्ह्यात गावकीकडून बहिष्काराची उघडकीस आलेली प्रकरणं शमत नाहीत तोच शेजारच्या रत्नागिरीतही असाच प्रकार समोर आलाय. जातीबाहेर लग्न केल्यामुळं एका तरूणाला गावातून बहिकृत होण्याची वेळ आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील बेलारी गावातील ही घटना आहे.  या तरूणानं देवरूख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांना केवळ समज देण्यात आलीय.

Updated: Apr 4, 2015, 03:13 PM IST
जातीबाहेर लग्न: देवरूखच्या शेलार कुटुंबियांना गावकीनं टाकलं वाळीत  title=

देवरूख, रत्नागिरी: रायगड जिल्ह्यात गावकीकडून बहिष्काराची उघडकीस आलेली प्रकरणं शमत नाहीत तोच शेजारच्या रत्नागिरीतही असाच प्रकार समोर आलाय. जातीबाहेर लग्न केल्यामुळं एका तरूणाला गावातून बहिकृत होण्याची वेळ आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील बेलारी गावातील ही घटना आहे.  या तरूणानं देवरूख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांना केवळ समज देण्यात आलीय.

देवरूखच्या शेलार कुटुंबियांना गेल्या दीड वर्षांपासून गावानं बहिष्कृत केलंय. या कुटुंबाचा दोष इतकाच आहे, की या कुटुंबातील शैलेश शेलार यानं मराठा समाजाबाहेरील मुलीबरोबर विवाह केलाय. मुंबईत असताना शैलेशनं हा प्रेम विवाह केला. आईच्या मृत्यूनंतर वडिलांना संभाळण्यासाठी शैलेश गावामध्ये आला पण समाजानं त्याला स्वीकारलं नाही. गावातच्या जात पंचायतीनं त्याला पाच हजारांचा दंड ठोठावला. 

ग्रामस्थांच्या या अन्यायाविरोधात शैलेश आणि त्याच्या काकानं देवरूख पोलीस स्थानकाचा दरवाजा ठोठावला. यापूर्वी अशाच पद्धतीचा अन्याय झालेल्या आपल्या मुंबईस्थित काकासह स्वता:ची तक्रार शैलेशनं दाखल केली. शैलेश आणि त्याचे काका वसंत शेलार यांच्या तक्रारीवरून पोलीस तपास करतायत.

शैलेशवर होत असलेल्या अन्यायाची माहिती घेण्याकरीता आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या बेलारी गावात पोहोचलो. मात्र गावात याबाबत कोणीच उघडपणे बोलायला तयार नव्हतं. गावच्या पाटलांनीही कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला पण खासगीत बोलताना आपल्या कृत्याचं त्यांनी समर्थनच केलं.

गावाच्या असहकारामुळं शैलेशला आपल्या वडिलांसह गाव सोडावं लागलंय. रोजी रोटीसाठी त्यांनी आता देवरूख शहराचा आसरा घेतलाय. मात्र शिमगा, गणपती अशा उत्सवात शैलेशला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. विशेष म्हणजे आंतरजातीय विवाह करून शैलेशनं मोठा गुन्हा केला असं म्हणणाऱ्या ग्रामस्थांची शैलेशनं पाच हजार जमा करताच त्याचे सर्व गुन्हे माफ करण्याची तयारी आहे. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही नक्कीच लाजीरवाणी गोष्ट आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.