'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही

Updated: Dec 4, 2016, 04:43 PM IST
'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही' title=

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

नोटा बंदी नंतर आता नागरिकांना त्रास होतोय पण ते मानायला अजून लोक तयार नाहीत हे पटवून देण्यासाठी त्यांनी मारुतीच्या बेंबीचे उदाहरण दिलं. लहान असताना मी मारुतीच्या बेंबीत बोट घातलं, मला विंचू डसला मी लगेच बोट काढलं. मित्राने विचारलं काय झालं मी सांगितलं गार वाटतय, मित्रांनी बोट घातलं त्याला ही विंचू डसला. त्याला विचारलं काय झालं, तो हे म्हणाला खूपच गार आहे. तसंच तिसऱ्या मित्राचे झाले. नोटबंदीचंही तसंच आहे. त्रास होतोय पण लोकं सांगायला घाबरतायेत अश्या शब्दात पवारांनी लोकांच्या मानसिकतेचं ही वर्णन केलं.

सहकारी ब्यांकेना घातलेल्या निर्बंधांवरही त्यांनी टीका केली. या निर्णयामुळं बॅंकांशी निगडित १ कोटीपेक्षा अधिक कुटुंबांची अडचण झाल्याचं पवारांनी सांगितलं.