पुणे : शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी शरद जोशी यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी शरद जोशी यांच्या दोन्ही मुली आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद जोशी यांनी परदेशातली नोकरी सोडली आणि शेतकऱ्यांचं दु:ख कमी करण्यासाठी सोडवण्यासाठी, ग्रामीण भागातील गरीब शेतकरीला कवटाळलं. म्हणून शरद जोशी हे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरातले सदस्य झाले होते.
शरद जोशी यांना निरोप देतांना आज शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पुण्याच्या मुळा नदीपात्रात शरद जोशी यांचं पार्थिव सकाळी अकरा वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.