अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

राज्यात राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे सत्र सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही राष्ट्रवादीला धक्का बसलाय. नेवासा तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे  नेते शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

Updated: Jan 28, 2017, 05:30 PM IST
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का title=

अहमदनगर : राज्यात राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे सत्र सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही राष्ट्रवादीला धक्का बसलाय. नेवासा तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे  नेते शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी रस्त्यावरील आमराई मळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या पक्षात राहण्याचा आग्रह भाषणात कुणीही करु नये’. अशी भूमिका शंकरराव गडाख यांनी बैठकीच्या प्रारंभालाच जाहीर केल्याने ते राष्ट्रवादी सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. माजी खासदार आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी समजल्या जाणा-या यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गडाख यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घुले, माजी आमदार पांडूरंग अंभग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यावर टीका केली.. एवडेच नाही तर आपल्या भाषणात गडाख यांनी घुले यांना आव्हान देत राष्ट्रवादीला तालुक्यातून हद्दपार करण्याची घोषणा केली आहे.