शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Updated: Mar 10, 2017, 09:04 AM IST
शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार title=

सातारा : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

दीपक घाडगे हे साताऱ्यातील फत्यापूर गावचे रहिवासी होते. जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पडगमपुरा भागात गुरूवारी सकाळपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या ठिकाणी 4-5 दहशतवादी घरात लपून बसल्याचा संशय होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालून कारवाई केली. या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झालाय.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फत्यापूर गावचे सुपुत्र दीपक जगन्नाश घाडगे यांना वीरमरण आल्यामुळे गावावर शोककळा पसरलीय. दीपक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.