ठाण्यात शिवसेनेचे दोन थीम पार्क , सोमवारी भूमिपुजन

 मनसे आणि शिवसेनेतील थीम पार्कमधील राजकारण रंगात आलेलं असतानाच ठाण्यात दोन थीम पार्क उभारण्याचा घाट शिवसेननं घातलाय. सोमवारी या दोन्ही थीम पार्कचं भूमिपूजन होणार आहे. या थीम पार्कला ठाणे महानगरपालिकेनंही ग्रीन सिग्नल दिला आहे. 

Updated: Aug 23, 2014, 08:03 PM IST
ठाण्यात शिवसेनेचे दोन थीम पार्क , सोमवारी भूमिपुजन title=

ठाणे : मनसे आणि शिवसेनेतील थीम पार्कमधील राजकारण रंगात आलेलं असतानाच ठाण्यात दोन थीम पार्क उभारण्याचा घाट शिवसेननं घातलाय. सोमवारी या दोन्ही थीम पार्कचं भूमिपूजन होणार आहे. या थीम पार्कला ठाणे महानगरपालिकेनंही ग्रीन सिग्नल दिला आहे.

लोकमान्य नगर आणि घोडबंदर रोड आणि अशा दोन ठिकाणी हे थीम पार्क उभारण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. एक थीम पार्क हे चित्रपटसृष्टीतील 100 वर्ष तर दुसरं थीम पार्क जुनं ठाणे-नवीन ठाणे या थीमवर उभारण्यात येणार आहे. 

मनसेच्या अम्युझमेंट पार्कला शिवसेनेचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झालीये. ज्या जागेवर हे पार्क उभं रहाणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीये. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय.

शिवसेनेनं याबाबत कांजूर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केलीये. मंगेश सांगळे यांनी केवळ भांडुपेश्वर कुंडाच्या शुशोभिकरणासाठी परवानगी घेतली असून मतांचं राजकारण करण्यासाठी हे अनाधिकृत थीम पार्क बनवण्याचा घाट घातल्याची टीका शिवसेनेनं केलीये.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या थिमपार्क कामाचे भूमिपुजन केले. आम्ही रितसर परवानगी घेतल्याचे आमदार मंगेश सांगळे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत मनसेनेने तर ठाण्यात शिवसेनेने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.