नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, विदर्भाबाबत चाचपणी करणाऱ्या अणेंविरोधात हक्कभंग आणलाय.
अधिक वाचा : भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट
वेगळ्या विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेनेनं हक्कभंग ठराव आणला आहे. त्याआधी सकाळी अणेंविरोधात शिवसेनेनं विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केलं.
दरम्यान, अणे यांच्या विधानावरुन नागपूर विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हकालपट्टीची मागणी शिवसेनेनं केली आहे. यावेळी अखंड महाराष्ट्राच्या बाजूनं शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रमकपणा कायम ठेवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.