रायगडमधल्या या धबधबे आणि डॅमवर जमावबंदी

पावसाळ्यात पर्यटक धरणं आणि धबधब्यांवर जात मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, अशावेळी अतिउत्साहात काही दुर्घटनाही होत आहेत.

Updated: Jul 24, 2016, 07:55 PM IST
रायगडमधल्या या धबधबे आणि डॅमवर जमावबंदी   title=

रायगड : पावसाळ्यात पर्यटक धरणं आणि धबधब्यांवर जात मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, अशावेळी अतिउत्साहात काही दुर्घटनाही होत आहेत. गेल्या काही दिवसांत कर्जत आणि खालापूर तालुक्यात अशा दुर्घटनांमध्ये 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामुळे प्रशासनाकडून रायगड जिल्ह्यातील धरण आणि धबधब्यांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  

कर्जत, खालापुर तालुक्यातील 11 ठिकाणी जिल्हाधिका-यांनी स्थानिकांच्या मागणी नुसार जमावबंदी लागू केली आहे. यामध्ये खालापुर मधील नढाळ धरण, आडोशी, बोरगाव, झेनिथ धबधबा तर कर्जत तालुक्यातील आशाने वॉटर फॉल, सोलनपाडा धरण, जुम्मापट्टी, बेडिसगाव धबधबा, पाली भुतिवली ,कोंडाणे, पळसदरी धरण आणि धबधबा आदी ठिकाणांवर 144  कलम लागु करण्यात आलं आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मात्र पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.