सिंधुदुर्ग : पाण्याखालची अनोखी दुनिया पहायचीय? चला तर मग सिंधुदुर्गात... पर्यटन महामंडळानं ही सोय उपलब्ध करुन दिलीय.
पाण्याखालचं जगात रंगीबेरंगी मासे, विविध रंगी शेवाळं, विविध आकारातले दगड आणि असं बरंच काही आपण आजवर पाहत होतो ते फक्त सिनेमात... पण आता याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हीही घेऊ शकता. तो सुधा चक्क समुद्र तळाशी जाऊन... मालवणात ही दुनिया बघायला मिळतेय फक्त एक हजार रुपयांमध्ये...
पर्यटन महामंडळानं तसेच काही स्थानिक मंडळींनी स्कुबा डायव्हिंग सुविधा उपलब्ध करुन दिलीय. त्याचा स्वप्नवत अनुभव सध्या मालवणात पर्यटक घेत आहेत.
जसा पर्यटकांना हा नवा पर्याय उपलब्ध झालाय. तसाच स्थानिकांना रोजगारही मिळालाय. मालवणात पर्यटकांची तोबा गर्दी होतेय.
निसर्गसौंदर्यानं नटलेल्या कोकणात येण्यासाठी पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगचं आणखी एक निमित्त मिळालंय.
कोकणात पूर्वी फक्त मच्छिमारी हाच प्रमुख व्यवसाय होता आता स्कुबा डायव्हिंग कोकणातील किनारपट्टीतील अर्थकारण मात्र पूर्ण बदलून गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.